Chandrakant Patil | सत्ता येईल तर स्वतःच्या बळावर, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याबाबत केलेल्या टीकेला, शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याबाबत केलेल्या टीकेला, शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे, शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाही. असे प्रकार बाळासाहेबांपासून ते उद्धव ठाकरेपर्यंत कोणी केले नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. महाराष्ट्रापुढे खूप मोठी कामे आहेत. देशात पहिल्या पाचमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव येत आहे, हे विरोधी पक्षातील नेत्यांचे दुःख मी समजू शकतो. शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे, शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाही. असे प्रकार बाळासाहेबांपासून ते उद्धव ठाकरेपर्यंत कोणी केले नाहीत. बंद दाराआड काय झालं होतं आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले या चर्चेत आता आम्ही जात नाही, महाराष्ट्रातलं वातावरण आता वेगळे आहे आणि या जनतेला मदतीची गरज आहे”