मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारात जाणारा भाविक आता थांबणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा इशारा
लोकभावना दाबून ठेवणार नाही तर कुलुप तोडून मंदिर खुलं करणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.संध्याकाळपर्यंत मंदिरांसदर्भात निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम राज्य सरकारला चंद्रकात पाटील यांनी दिला आहे.
लोकभावना दाबून ठेवणार नाही तर कुलुप तोडून मंदिर खुलं करणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.संध्याकाळपर्यंत मंदिरांसदर्भात निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम राज्य सरकारला चंद्रकात पाटील यांनी दिला आहे. कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील बोलत होते. आता या पेक्षा महाराष्ट्राचा नागरिक मंदिरात जाण्यापासून हिंदू, मशिदीत जाण्यापासून मुस्लीम, चर्चमध्ये जाण्यापासून ख्रिश्चन, गुरुद्वारामध्ये जाणाऱ्या शीख बांधवांना तुम्ही रोखू शकणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ईडी आणि सीबीआय या यंत्रणा स्वायत्त आहेत, त्यांना कोणताही पक्ष चालवत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. भाजपकडून राज्यभरात मंदिर उघडण्यासाठी आज आंदोलन करण्यात येत आहेत. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं आहे.
Latest Videos