VIDEO : Chandrakant Patil | मला माजी मंत्री म्हणू नका, का ते 2-3 दिवसांत कळेल - चंद्रकांत पाटील

VIDEO : Chandrakant Patil | मला माजी मंत्री म्हणू नका, का ते 2-3 दिवसांत कळेल – चंद्रकांत पाटील

| Updated on: Sep 16, 2021 | 2:17 PM

पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव मधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला तेंव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत पाटलांनी दिले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. पुण्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले आहेत. पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव मधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला तेंव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत पाटलांनी दिले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं.

Published on: Sep 16, 2021 02:16 PM