ब्रिजभूषण सिंहांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदाराने विरोध केला आहे. राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे. “राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. आधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी मगच अयोध्येत यावं” असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
मुंबई: भाजप (BJP)प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) राज ठाकरेंविरोधात बोलणाऱ्या भाजपच्या खासदाराविषयी आपली प्रतिक्रिया मांडलीये. कुठल्याही भाजप खासदाराची वैयक्तिक भूमिका असू शकते, भाजप खासदाराची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका नव्हे असं ते म्हणालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला भाजपा खासदाराने विरोध केला आहे. राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे. “राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. आधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी मगच अयोध्येत यावं” असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
Latest Videos