Chandrapur Forest Fire | चंद्रपुरच्या जंगलात वणवा, परिसरात धुरांचे लोट
मामला येथे घनदाट जंगल आहे. याठिकाणी वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. हा भाग बफर क्षेत्रात येतो. ब्लोअरनं आग विझविण्यात येते. पण, ही यंत्रणा सक्षम दिसत नाही. चंद्रपूर हा वनव्याप्त जिल्हा आहे. पण, त्यामानानं आग विझविणारी यंत्रसामुग्री अपुरी आहे. जंगलाला लागलेल्या आगीमुळं वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येतो. शिवाय रोपटे जळून खाक होतात.
चंद्रपूर : जिल्ह्यातील मामला जंगलात (Mamla forest) मोठा वनवणवा नजरेस पडला आहे. काल रात्रीपासून या परिसरामध्ये धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. चंद्रपूर-गडचिरोली (Chandrapur-Gadchiroli) राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच शेकडो हेक्टरवर वनसंपदा आगीच्या विळख्यात सापडली आहे. प्राणी वन्यजीव व पशुपक्षी वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या दोन महिन्यातला हा सर्वात मोठा वणवा असल्याची ग्रामस्थांची माहिती आहे. वनवणवा नियंत्रणात आणण्यासाठी गेले काही वर्ष वनविभागाचे (Forest Department) सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र मामला येथील वणव्याने हा दावा सपशेल फोल ठरलाय. तातडीने अधिक कुमक लावून वणवा नियंत्रणात आणण्याची गरज व्यक्त होत आहे.
Published on: May 20, 2022 09:37 PM
Latest Videos