चंद्रपुरात महसूल विभागाची तप्तरता; पीडितांना मदत देण्यासाठी सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर
पुराचे पाणी थेट शेती आणि रहिवाशी ठिकाणी घुसले. ज्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यामागणीवरून आता महसूल विभागाने तप्तरता दाखवली आहे.
चंद्रपूर, 01 ऑगस्ट 2023 | चंद्रपूर जिल्ह्यात या महिन्यात पावसाने हाहाकार केलाय. अनेक नद्यांना पूर आला. ज्यामुळे पुराचे पाणी थेट शेती आणि रहिवाशी ठिकाणी घुसले. ज्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यामागणीवरून आता महसूल विभागाने तप्तरता दाखवली आहे. तर विभागाच्यावतीने इरई नदीच्या किनारी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. तर राज्य आपत्ती निवारण कायद्याच्या निकषांप्रमाणे पीडितांना मदत देण्यासाठी अचूक सर्वेक्षण केलं जात आहे. आतापर्यंत चंद्रपूर शहराच्या हद्दीत 1100 पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर मदतीचेही वाटप करण्यात आले आहे. याच भागातील पूरग्रस्तांची 1200 कुटुंबांची यादी तयार कऱण्यात आली आहे. तर 3000 कुटुंबांना पूरग्रस्ताची मदत दिली जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर सर्वेक्षण शास्त्रीय दृष्ट्या केल्या केले जाणार असल्याने येत्या काळात या संपूर्ण भागामध्ये पुराची नेमकी स्थिती, कारणे व उपाय योजना याबाबतही ठोस निर्णय होण्यास मदत होणार आहे. तर चंद्रपूर तालुक्यात सुमारे 5 हजार हेक्टर शेतीवर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.