Chandrashekhar Bawankule | डिसेंबरपर्यंत डेटा द्यावा आणि ओबीसींना न्याय द्यावा-चंद्रशेखर बावनकुळे

| Updated on: Jul 29, 2021 | 8:10 PM

ओबीसी आरक्षण न देता धनदांडग्यांना ओबीसींच्या जागांवर उभं करायचं असं सरकारचं षडयंत्र आहे, असं आम्हाला वाटतं. मग मात्र गावागावात, रस्त्यांवर संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

बारामती : बारामतीतून ओबीसींचा एल्गार पुकारला गेला, तो महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचेल. राजकारण न करता आम्ही भाजप नेते सरकारच्या मदतीला तयार आहोत. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ओबीसींचा डेटा तयार करावा. ओबीसी आयोग तयार झाला आहे. डेटा तयार करायला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण थांबवलं नाही, केवळ डेटा तयार करण्याची सूचना केलीय. पण ओबीसींना आरक्षण द्यायचं मनात नसेल म्हणून ओबीसींचा फुटबॉल केला जातोय. केंद्राकडून डेटा घेण्याचा चुकीचा ठराव विधीमंडळात आणला गेला. विधीमंडळाचा वापर राजकारणासाठी केला गेला. ओबीसी आरक्षण न देता धनदांडग्यांना ओबीसींच्या जागांवर उभं करायचं असं सरकारचं षडयंत्र आहे, असं आम्हाला वाटतं. मग मात्र गावागावात, रस्त्यांवर संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.