त्यांची घरं मातीची झाली म्हणून पडतायत अन् भाजपमध्ये ते येतायत, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कुणावर निशाणा?

त्यांची घरं मातीची झाली म्हणून पडतायत अन् भाजपमध्ये ते येतायत, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कुणावर निशाणा?

| Updated on: Feb 08, 2023 | 1:05 PM

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही काही संन्यासी नाहीत, आम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने आम्ही पक्ष वाढवण्याचे काम करत आहोत.'

नागपूर : सध्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक पक्षातंर होत आहे. इतर पक्षातील नेते भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपमध्ये वेगवेगळे अभियान राबवले जातात. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही काही संन्यासी नाहीत, आम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने आम्ही पक्ष वाढवण्याचे काम करत आहोत. ज्यांची घरं मातीची झाली आहेत त्यांच्या मातीच्या घरी राहायला कोणी तयार नाही. म्हणून लोक आमच्याकडे राहायला येतात. आम्ही त्यांना थांबवत नाही, आम्ही मात्र कोणाच्या घरात जात नाही. आम्ही कोणालाही ऑफर देणार नाही. आमच्या पक्षात या, असा निमंत्रण देणार नाही.. मात्र भाजपमध्ये कोणीही आला तर त्यांचा स्वागत करू, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

तर त्यांच्या पक्षात जेवढा सन्मान दिला जात आहे त्यापेक्षा जास्त सन्मान भाजपमध्ये देऊ. स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. येणाऱ्या काही दिवसात असे पक्षप्रवेश होत राहणार. 2024 मध्ये एवढे पक्षप्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट होणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना उमेदवार भेटणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Published on: Feb 08, 2023 01:04 PM