कॅसिनो प्रकरणानंतर चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदाच मीडियासमोर; म्हणाले, फोटोवरून कुणाची इमेज…
कॅसिनोतील फोटोवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत. अशातच संजय राऊत यांनी आपल्याकडे २७ फोटो आणि पाच व्हिडीओ असल्याचे दावा करत पुन्हा एकदा इशारा दिलाय. या इशाऱ्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची कॅसिनो प्रकरणावर पहिल्यांदाच मीडियासमोर प्रतिक्रिया
मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : मकाऊतील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कॅसिनोतील फोटोवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत. अशातच संजय राऊत यांनी आपल्याकडे २७ फोटो आणि पाच व्हिडीओ असल्याचे दावा करत पुन्हा एकदा इशारा दिलाय. या इशाऱ्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॅसिनो प्रकरणावर पहिल्यांदाच मीडियासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. फोटोच्या आधारावर कुणाची इमेज खराब करता येत नाही, असे स्पष्टपणे भाष्य करत त्यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. तर कुणी हा प्रयत्न केला आहे त्याला लखलाभ असे म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला आहे. पुढे ते असेही म्हणाले, की, गेल्या 34 वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक जीवनात आहे, विधिमंडळात 20 वर्षांपासून आहे. तर मी चार वेळा निवडून आलो. त्यामुळे अशा फोटोच्या आधारावर कुणाची इमेज खराब करता येत नसल्याचे थेट प्रत्युत्तर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर त्यांनी दिलंय.