अजित पवारांना 440 व्होल्टचा करंट देणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचं थेट आव्हान

अजित पवारांना 440 व्होल्टचा करंट देणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचं थेट आव्हान

| Updated on: Feb 21, 2023 | 1:31 PM

Pimpri Chinchwad by Election : चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी अजित पवार आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. ते काय म्हणालेत? पाहा...

पिंपरी चिंचवड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केलीय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तारतम्य बाळगून बोलावं, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला होता. मात्र त्याला उत्तर देताना बावनकुळे यांनी अजित पवारांना 440चा करंट देण्याचा पुनरुच्चार केला आहे.  “भाजप आणि घटक पक्ष तारतम्य बाळगूनच आहेत. पण विरोधकांना पराभव दिसत असल्याने तेच तारतम्य विसारले आहेत”, असा पलटवार ही बावनकुळे यांनी केला.

Published on: Feb 21, 2023 01:30 PM