“काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याची नाना पटोले यांना चाहूल”, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
राज्यात सुरु असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.नाना पटोले यांच्या विधानानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भिवंडी : राज्यात सुरु असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. “भाजपने महाराष्ट्राला कलंक लावला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठी आम्ही राज्यपालांना भेटणार” असं नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांच्या विधानानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “नाना पटोले यांना भीती वाटत आहे.काँग्रेसमध्ये पण अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरकार परत येणार नाही, यामुळे त्यांच्यात एक अस्वस्थ गट आहे. ते भविष्यात वेगळा निर्णय घेतील का अशी भीती नाना पटोले यांना आहे.म्हणून ते धैर्य देण्यासाठी बोलत आहेत.”
Published on: Jul 13, 2023 02:24 PM