Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात सरकारी सुट्टी जाहीर होणार?
भाजपचे बडे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी २२ जानेवारीला महाराष्ट्रात सरकारी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्र पाठवणार आहे.
मुंबई, ११ जानेवारी २०२४ : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा, अशी मागणी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत केली त्यानंतर भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी केली होती. आता भाजपचे बडे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी २२ जानेवारीला महाराष्ट्रात सरकारी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्र पाठवणार आहे. तर २२ जानेवारी रोजी अयोध्येत मोठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. देशात हा उत्सव दिवाळीसारखा साजरा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर योध्येत श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला महाराष्ट्रात सरकारी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी कित्येक रामभक्तांनी केली त्यामुळे यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.