Chandrayaan-3 चा लँडर आणि इस्त्रोचा संपर्क, चंद्राच्या पृष्ठभागाचे इस्त्रोने पाठवलेले फोटो तुम्ही पाहिले का?

Chandrayaan-3 चा लँडर आणि इस्त्रोचा संपर्क, चंद्राच्या पृष्ठभागाचे इस्त्रोने पाठवलेले फोटो तुम्ही पाहिले का?

| Updated on: Aug 23, 2023 | 10:28 PM

VIDEO | इस्त्रोचं ऐतिहासिक पाऊल...चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरने चंद्रावर पहिलं पाऊल टाकल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाचे पाठवले फोटो, इस्त्रोने ट्विट करून पाठवलेले फोटो तुम्ही पाहिले का?

मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण देशात आनंद बघायला मिळत आहे. चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंग होणं ही देशातील प्रत्येकासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. इस्त्रोच्या या यशस्वी कामगिरीमुळे इस्त्रोच्या संपूर्ण टीमचं देशभरातून कौतुक केले जात आहे. या कामगिरीनं अंतराळ इतिहासात इस्त्रोनं नवा अध्याय लिहीला आहे. अशातच चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरने चंद्रावर पहिलं पाऊल टाकल्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागाचे चार फोटो पाठवले आहेत. इस्त्रोने हे फोटो त्यांच्या ट्वीटवरून शेअर केले आहेत. दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत हा पहिला देश आहे. देशाच्या कानाकोऱ्यात एकच आता जल्लोष बघायला मिळत आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार प्रत्येक भारतीयाला व्हायचे होते. चंद्रयान 3 (Chandrayaan 3) च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रत्येक जण शास्त्रज्ञांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

Published on: Aug 23, 2023 10:28 PM