Special Report | सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा -Tv9
कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. नगरपंचायतीच्या आवारात वाहने नेण्यास मनाई असतानाही शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी गाडी आत घुसवल्याने त्याला भाजप कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमकी उडाल्या.
कुडाळ: कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. नगरपंचायतीच्या आवारात वाहने नेण्यास मनाई असतानाही शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी गाडी आत घुसवल्याने त्याला भाजप कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमकी उडाल्या. प्रकरण धक्काबुक्कीवर आलं. शेकडो कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणावाचे वातावण निर्माण झालं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटात पुन्हा राडा होऊ नये म्हणून या परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं. दरम्यान, कुडाळच्या नगराध्यपदी काँग्रेसच्या आफ्रिन करोल या विजयी झाल्या आहेत. त्यांना 9 मते मिळाली तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकरांना 8 मते मिळाली आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.