Ambernath | MIDC मध्ये रासायनिक गॅसगळती, 18 ते 20 जणांना त्रास

Ambernath | MIDC मध्ये रासायनिक गॅसगळती, 18 ते 20 जणांना त्रास

| Updated on: Oct 12, 2021 | 7:03 PM

आनंदनगर येथील आर के कॅमिकल्स या कंपनीतून रासायनिक गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या अचानक झालेल्या गळतीमुळे काही जणांना त्रास झाल्याचेही समोर आले आहे.

अंबरनाथच्या आनंदनगर येथील औद्योगिक वसाहतीत गॅस गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आनंदनगर एमआयडीसीमधील आर के कॅमिकल्स या कंपनीच्या प्लांटमधून रासायनिक गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. सल्फुरिक एसिड बाहेर पडत ही गॅस गळती झाली आहे. या अचानक झालेल्या गळतीमुळे काही जणांना त्रास झाल्याचेही समोर आले आहे. संबधितांना मळमळ, उल्टीसारखा त्रास झाला आहे.