शरद पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत एक फोन गेला अन्…; छगन भुजबळांचा गंभीर आरोप
राज्यात मराठा आोबीसी आरक्षणाचा जो मुद्दा गाजतोय त्यावरून होणारे वाद शांत कसं होईल, याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या बैठकीला विरोधी पक्षातील नेत्यांनी येणं क्रमप्राप्त होतं, असं छगन भुजबळ म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, मी स्वतः विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं तुम्ही सुद्धा या....
मराठा आरक्षणासाठी सह्याद्रीवर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. यामध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांनी यावं आणि मार्गदर्शन करावं. आरक्षणाचा जो मुद्दा गाजतोय त्यावरून होणारे वाद शांत कसं होईल, याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या बैठकीला विरोधी पक्षातील नेत्यांनी येणं क्रमप्राप्त होतं, असं छगन भुजबळ म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, मी स्वतः विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं तुम्ही सुद्धा या. बैठकीला येण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा बोललो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की शरद पवार यांना सुद्धा बोलवा. कारण आतापर्यंत शरद पवारांनी आरक्षण दिलं. त्याचे आभार आम्ही मानले. पण आता निर्माण झालेल्या आरक्षणाच्या परिस्थिती दरम्यान राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी बैठकीला यायला हवं होतं. मात्र, सगळे येणार होते. संध्याकाळी पाच वाजता बारामतीमधून एक फोन आला आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला.