Special Report : केसरकर यांच्या भक्तीची शक्ती? प्रार्थनेच्या दाव्यावर भुजबळ आणि राऊत यांचा खोचक टोला

Special Report : केसरकर यांच्या भक्तीची शक्ती? प्रार्थनेच्या दाव्यावर भुजबळ आणि राऊत यांचा खोचक टोला

| Updated on: Jul 31, 2023 | 7:14 AM

कोल्हापूर जिल्ह्यात एका आठवड्यात पडलेल्या मुसळधार पाऊसामुळे राधानगरी धरणाचे आधी दोन आणि त्यानंतर सलग पाच दरवाजे उघडले गेले त्यामुळे पंचगंगा इशारा पातळीच्या बाहेर गेली. त्यामुळे आता कोल्हापूरला पुराचा फटका बसणार अशीच स्थिती झाली होती.

मुंबई, 31 जुलै, 2023 | राज्याच्या अनेक भागात जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आला होता. कोकण, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तर संततधार सुरूच राहिल्याने कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी उफाळून वाहत होती. कोयना आणि राधानगरी धरण क्षेत्रात तर मुसळधार पावसाने सपाटाच लावला होता. त्यामुळे दोन्ही धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात होता. त्याचदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात एका आठवड्यात पडलेल्या मुसळधार पाऊसामुळे राधानगरी धरणाचे आधी दोन आणि त्यानंतर सलग पाच दरवाजे उघडले गेले त्यामुळे पंचगंगा इशारा पातळीच्या बाहेर गेली. त्यामुळे आता कोल्हापूरला पुराचा फटका बसणार अशीच स्थिती झाली होती. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेचा आता देवा असं काय करू नको अशीच आर्तहाक सुरू होती. याचदरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर त्यांच्या एका दाव्यामुळे आता चांगलेच चर्चेत आलेत. त्यांनी कोल्हापूरला पूर हा आपण केलेल्या प्रार्थनेमुळे आला नसल्याचा दावा केला. त्यावरून आता टोलेबाजी सुरू झाली आहे. तर सत्तेत सहभागी असणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासह ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी देखील यावरून खोचक टोला लगावलाय. पाहा काय नेमकं काय सुरू झालं आहे ते….

Published on: Jul 31, 2023 07:14 AM