'देवेंद्र फडणवीस आले पण त्या खुर्चीत नाही...', छगन भुजबळ यांनी काय लगावला टोला?

‘देवेंद्र फडणवीस आले पण त्या खुर्चीत नाही…’, छगन भुजबळ यांनी काय लगावला टोला?

| Updated on: May 06, 2023 | 3:37 PM

VIDEO | देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' विधानावर छगन भुजबळ यांचा टोला, काय म्हणाले बघा व्हिडीओ

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल असं वक्तव्य केलं. आणि ते म्हणाले मी पुन्हा येईल असं म्हटलं की मी पुन्हा येतोच….या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या विधानावर छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. मी पुन्हा येईल, असं त्यांनी ज्या खुर्चीसाठी म्हटलं होतं मात्र त्या खुर्चीत ते परत काही आले नाही, असे वक्तव्य करत छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला. अशातच कर्नाटक निवडणुकांच्या प्रचाराचा बिगुल वाजला आहे. अनेक नेते राज्यातील नेते कर्नाटक वारीवर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस हे बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी तालुक्यातील निट्टूर येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे, असे वक्तव्य त्यांनी केल्याचे पाहायला मिळाले.

 

Published on: May 06, 2023 03:32 PM