जाळपोळ, गावबंदी, म्हातारपण अन् लायकी; छगन भुजबळ यांचा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल काय?

जाळपोळ, गावबंदी, म्हातारपण अन् लायकी; छगन भुजबळ यांचा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल काय?

| Updated on: Nov 27, 2023 | 10:16 AM

हिंगोली येथील सभेतून भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा जोरदार हल्ला चढवला. बीडमध्ये जाळपोळ, नेत्यांना गावबंदी, जरांगेंनी केलेली म्हातारपणाची टीका, जरांगे यांचं लायकीचं वक्तव्य असा अनेक मुद्द्यावरून भुजबळांनी चांगलाच समाचार घेतला. जरांगे पाटलांचं लायकीचं वक्तव्य आणि छगन भुजबळ यांनी काय दिलं जोरदार प्रत्युत्तर बघा...

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३ : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. केलेल्या प्रत्येक टीकेला भुजबळ यांनी हिंगोलीतील सभेतून प्रत्युत्तर दिलंय. म्हातारपण, लायकीवरून भुजबळांचा जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यालाच जरांगेंनी देखील पुन्हा पलटवार केलाय. हिंगोली येथील सभेतून भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा जोरदार हल्ला चढवला. बीडमध्ये जाळपोळ, नेत्यांना गावबंदी, जरांगेंनी केलेली म्हातारपणाची टीका, जरांगे यांचं लायकीचं वक्तव्य असा अनेक मुद्द्यावरून भुजबळांनी चांगलाच समाचार घेतला. पुण्यातील खराडी येथील सभेतून बोलत असताना हुशार असून लायकी नसणाऱ्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली असल्याचे धक्कादायक विधान केलं होतं. यावरही जोरदार पलटवार केलाय. जरांगे पाटलांचं लायकीचं वक्तव्य आणि छगन भुजबळ यांनी काय दिलं जोरदार प्रत्युत्तर बघा…

Published on: Nov 27, 2023 10:16 AM