छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; 'हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर…',

छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; ‘हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर…’,

| Updated on: Oct 13, 2024 | 12:30 PM

बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री सव्वा ९ ते साडे ९ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील आहे’, असं छगन भुजबळ म्हणाले. तर ‘बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षांपासून ओळखत होतो. त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना वाय सुरक्षा सुरक्षादेण्यात आली होती. मात्र सुरक्षा देऊन काही होत नाही. धमकी कोणी दिली होती याच्या तपास करायला पाहिजे होतं. पोलीस काय करत होते?’, असा सवाल करत छगन भुजबळ य़ांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरून हल्लाबोल केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, आमच्या भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निर्घृण पणे हत्या करण्यात आली आहे. मुंबई पोलिसासाठी हे एक चॅलेंज आहे. 10 /20 हजारात ही पोरं हत्या करत आहेत. ही कॉन्ट्रकट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड दिलं पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

Published on: Oct 13, 2024 12:30 PM