हायच ना यार म्हातारा… खोचक टोला लगावत छगन भुजबळ यांचा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात चांगलेच शाब्दित वार पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना म्हातारा झाल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्यावरून छगन भुजबळ यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली
हिंगोली, २६ नोव्हेंबर २०२३ : हिंगोलीमध्ये आज ओबीसी समाजाच्या महाएल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या महाएल्गार सभेच्या निमित्ताने भाषण करताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात चांगलेच शाब्दित वार पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना म्हातारा झाल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्यावरून छगन भुजबळ यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली. भुजबळ हायच ना यार म्हातारा. सर्वच म्हातारे होणार. तुझे मातापिताही म्हातारे झाले असतील. तूही होशीलच. पण हे केस पिकले ना, एका आंदोलनाने पिकले नाही. जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलने या छगन भुजबळने केली आहेत. जीवाची पर्वा न करता आंदोलने केली आहेत. आंदोलन भुजबळांना नवीन नाही, असं भुजबळ म्हणाले.