छगन भुजबळ यांचा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल अन् केला थेट सवाल, पुन्हा उपोषणाची गरज काय?
ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार येत्या २० फेब्रुवारीला अधिवेशन होणार आहे असे सांगितले असताना जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करण्याची गरज काय? असा थेट सवालच त्यांनी केला आहे.
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून सगेसोयरेच्या अध्यादेशासाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत असून सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. अशातच ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार येत्या २० फेब्रुवारीला अधिवेशन होणार आहे असे सांगितले असताना जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करण्याची गरज काय? असा थेट सवालच त्यांनी केला आहे. तर श्रेय घेण्यासाठीच मनोज जरांगे उपोषण करत असल्याचे म्हणत भुजबळांनी जरांगेंवर आरोप केले आहे. पुढे भुजबळ असेही म्हणाले की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी आमची भूमिका आधीपासून आहे. त्यामुळे मागच्या दाराने कुणबी म्हणून मराठ्यांना घुसवू नका. तसेच सगेसोयरेच्या माध्यमातून नको ती व्याप्ती वाढवून नका. याच्या विरोधात आमची लढाई सुरू आहे. वेगळं आरक्षण द्या असं आधीपासून आमचं म्हणणं असल्याचे भुजबळ म्हणाले.