गोपीनाथ मुंडे हयात असते तर..., 'तो' भावनिक किस्सा सांगतना छगन भुजबळ भावूक

गोपीनाथ मुंडे हयात असते तर…, ‘तो’ भावनिक किस्सा सांगतना छगन भुजबळ भावूक

| Updated on: Mar 18, 2023 | 6:56 PM

VIDEO | नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे या गावात गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमात छगन भुजबळ झाले भावूक, बघा कोणता होता तो किस्सा...

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे या गावात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या वेळेला छगन भुजबळ यांनी एक भावनिक किस्सा देखील सांगितला. याशिवाय गोपीनाथराव मुंडे हयात असते तर मी अडीच वर्षे जेलमध्ये गेलो नसतो असं मोठं वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी जाहीरपणे केले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील इतर मोठे नेते उपस्थित आहे. यावेळी त्यांनी असेही म्हटले की, गोपीनाथ मुंडे यांनी मला ओबीसी चळवळीत नेहमी मोठा भाऊ म्हणून मानलं आहे. भाजप बहुजनांमध्ये सर्वात जास्त प्रचार आणि प्रसार गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. ओबीसींची जातीय जनगणना करण्याचा आग्रह गोपीनाथ मुंडे यांनी धरला होता असेही छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.

Published on: Mar 18, 2023 06:56 PM