छगन भुजबळ यांची TV9 ला मुलाखत अन् सारं काही उघड! राष्ट्रवादीतला सस्पेंस अन् काय केले मोठे गौप्यस्फोट?
tv9 Marathi Special Report | मंत्री छगन भुजबळ यांनी टिव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीनंतर राष्ट्रवादीतला सस्पेंस आला उघडकीस, छगन भुजबळ यांनी दिलेल्या मुलाखतीतून मोठे गौप्यस्फोट केलेत. भुजबळांनी मोठा गौप्यस्फोट करताना म्हटलं की, सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करुन भाजपसोबत सत्तेत जायचं हे ठरलं होतं..
मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | छगन भुजबळांनी TV9ला दिलेल्या मुलाखतीनंतर, राष्ट्रवादीतला सस्पेंस उघडकीस आला. TV9 ला अजित दादांचे मंत्री, छगन भुजबळांनी दिलेल्या मुलाखतीतून मोठे गौप्यस्फोट केले. भुजबळांनी मोठा गौप्यस्फोट करताना म्हटलं की, सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करुन भाजपसोबत सत्तेत जायचं हे ठरलं होतं. तर हा प्रस्तावच भुजबळांनीच आणला होता असं पवार म्हणालेत, मात्र त्यानंतर भाजपसोबत जाणं मान्य नव्हतं. तर सुप्रिया ताईंनीही अध्यक्षपदाचा प्रस्ताव होता हे मान्य केलं, पण भाजपसोबत जाणं शक्य नव्हतं त्यामुळं प्रस्ताव फेटाळल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. पवारांचा भाजपसोबत जाण्यास नकार होता. मला जायचं नाही, तुम्हाला जायचं तर जा असं शरद पवार बोलल्याचं ऑन कॅमेरा भुजबळांनी मुलाखतीत म्हटलं. तसंच पहाटेचा शपथविधी हा दादांनी शब्द पूर्ण करण्यासाठीच केला, हेही भुजबळ म्हणालेत. म्हणजेच शरद पवारांना अंधारात ठेवून, शपथविधी झाला हे भुजबळांनी मान्य केल्याचं सुप्रिया ताई म्हणाल्यात. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट