गोपीनाथ मुंडे अन् वेगळा पक्षाचा वाद, पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून छगन भुजबळांचा खळबळजनक दावा
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र केलं तर एक वेगळा पक्ष निर्माण होईल, हे पंकजा मुंडे यांच विधान दिवसभर चर्चेत राहिलंय. त्या वादामध्ये छगन भुजबळ यांनी केलेला एक नवा दावा अनेकांचा भूया उंचावणारा ठरला.
गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना जर एकत्र केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील, इतकी ताकद प्रेम करणाऱ्यांची आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या भूवया उंचावणाऱ्या या विधानानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. विजय वडेट्टीवारांनी तर पंकजा मुंडेंना नव्या पक्षाचे नेतृत्व करण्याचे ही आवाहन केलं. नवा पक्ष काढण्यापर्यंत प्रतिक्रिया आल्यानंतर पंकजा मुंडेनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं दुसरीकडे मात्र गोपीनाथ मुंडे २००२ सालीच वेगळा पक्ष काढण्याच्या विचारात होते, त्यासाठी त्यांनी आपल्या दोन भेटीही घेतल्या होत्या, असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केलाय. दरम्यान, कोयते घासून ठेवा, या पंकजा मुंडे यांच्या विधानावर अधूनमधून होणाऱ्या टीकेवर सुद्धा आष्टीतून पंकजा मुंडेनी भाष्य केलं. तर जालन्याचं पालकमंत्री पद मिळालं असलं तरी आपलं बीडमध्ये आणि विशेष करून आष्टीकडेही लक्ष राहील असा सूचक इशारा पंकजा मुंडेनी सुरेश धस यांना दिला. ‘बीड तर माझाच आहे. बीडमध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला आता काय ते परत तिकडे राष्ट्रवादीला गेला आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे. तर मला जर जास्त काकणभर प्रेम करावं लागेल.’, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. तर याला पलटवार करताना धस म्हणाले, आष्टी भाजपचा आता मतदारसंघ झाला. इलेक्शनमध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? ते ज्या बोलतात ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं, असं धस म्हणाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?

वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू

गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल

लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
