नाव माहिती नसलेलेही ‘भारतरत्न’, त्यांच्यासोबत फुलेंना का बसवायचं? ‘त्या’ मागणीवर छगन भुजबळ यांचा थेट सवाल
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी भारतरत्न हा सन्मान जाहीर करण्यात आला. दरम्यान, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहेत. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.
मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी भारतरत्न हा सन्मान जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली. आडवाणी यांचा सन्मान हा भावनिक क्षण असल्याचे म्हणत मोदींनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहेत. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. आपल्यातले अनेक लोकं आहेत जे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहेत. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना कशाला भारतरत्न पुरस्कार द्यायचा? असा सवाल करत छगन भुजबळ म्हणाले, महात्मा असलेले फक्त दोन ते तीनच लोकं आहेत. मात्र भारतरत्न किती लोकं आहेत… महात्मा असलेल्या व्यक्तींना कशाला खाली आणायचं आपण? कितीतरी लोकांना आपण भारतरत्न पुरस्कार देत आहोत. पण ज्यांना नाव पण माहिती नाही, अशा नाव माहिती नसलेल्या भारतरत्न लोकांसोबत फुलेंना का बसावायचं ? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.