ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात छगन भूजबळ यांची भूमिका काय?

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात छगन भूजबळ यांची भूमिका काय?

| Updated on: Sep 08, 2023 | 7:34 AM

VIDEO | ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात छगन भूजबळ म्हणाले, ओबीसीच्या कोट्यातून निर्णय घेण्यासंदर्भात शरद पवार, नाना पटोले आणि एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे.

मुंबई, ८ सप्टेंबर २०२३ | मराठा आरक्षणा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष नाना पटोले सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदे या सर्वांनी भाष्य केलं आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाने काल बैठक घेऊन निर्णय सुद्धा घेतलेला आहे. मला वाटतं या संदर्भात सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. ओबीसीच्या कोट्यातून निर्णय घेण्यासंदर्भात शरद पवार, नाना पटोले आणि एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मुलुंडमध्ये एका दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला छगन भुजबळ यांनी भेट दिली होती. त्यावेळी ते बोलत होते.

Published on: Sep 08, 2023 07:31 AM