जरांगेंना काहीच समजत…, मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
छगन भुजबळ यांनी नाशिक मतदारसंघातून माघार घेतल्यानंतरही मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांवर निशाणा साधला होता. मात्र मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असं म्हणत भुजबळांनी जरांगे पाटलांव जोरदार पलटवार केला. ओपन मतदारसंघात ओबीसी उमेदवाराचं काय काम? असा सवाल जरांगे पाटील यांनी एका सभेतून केला होता. काय म्हणाले भुजबळ?
मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात पुन्हा राजकीय सामना रंगला आहे. महाराष्ट्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांवरून मनोज जरांगे पाटील यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील यांनी मोदींवर केलेल्या टीकेनंतर भुजबळ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. छगन भुजबळ यांनी नाशिक मतदारसंघातून माघार घेतल्यानंतरही मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांवर निशाणा साधला होता. मात्र मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असं म्हणत भुजबळांनी जरांगे पाटलांव जोरदार पलटवार केला. ओपन मतदारसंघात ओबीसी उमेदवाराचं काय काम? असा सवाल जरांगे पाटील यांनी एका सभेतून केला होता. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, ‘काय बोलायचं… जरांगे पाटील यांना काय सांगायचं…’ तर बीडच्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील एकत्र आले होते. तर शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंनीही याच कार्यक्रमात जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यामुळे मनोज जरांगे यांचा फायदा कुणाला होतो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.