Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, भुजबळांनी दिला इतर राज्यांचा दाखला

Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, भुजबळांनी दिला इतर राज्यांचा दाखला

| Updated on: Dec 27, 2021 | 11:16 AM

भारत सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत फेरविचार याचिका दाखल केली आहे आम्ही त्यात पार्ट होणार आहोत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. इम्पेरिकल  डेटा तयार करण्याचे काम आयोगानं सुरू केले आहे, असं देखील छगन भुजबळ म्हणाले.

आज राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. ओबीसी शिवाय निवडणुका घेऊ नयेत असा ठराव सभागृहात मंजूर केला आहे.  सर्वपक्षीय ठराव आज घेतला जाईल. केंद्र सरकारनं राजकीय ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली आहे.  भारत सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत फेरविचार याचिका दाखल केली आहे आम्ही त्यात पार्ट होणार आहोत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. इम्पेरिकल  डेटा तयार करण्याचे काम आयोगानं सुरू केले आहे, असं देखील छगन भुजबळ म्हणाले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, असं मत छगन भुजबळ यांनी इतर राज्यांचा दाखला देत मांडलं आहे.