सर्व कानुनी लोच्या तयार झालाय - छगन भुजबळ

सर्व कानुनी लोच्या तयार झालाय – छगन भुजबळ

| Updated on: Jul 20, 2022 | 2:40 PM

हे काही कळलं नाही, असं सांगतानाच सगळा कानुनी लोच्या झाला आहे. देशाला मार्गदर्शक ठरेल असा निकाल कोर्टाला द्यावे लागेल, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले

मुंबई: छगन भुजबळ मीडियाशी संवाद साधत होते. सर्व कानुनी लोच्या तयार झाला आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी हरीश साळवे (harish salve) यांनी 8 दिवसाची मुदत मागितली होती. त्यावर कोर्टाने त्यांना लिखित उत्तर द्यायला सांगितलं. याप्रकरणासाठी कोर्ट मोठा बेंच किंवा घटनापीठ स्थापन करणार आहे की नाही हे लवकरच कळेल, असंही भुजबळ म्हणाले. जैसे थे परिस्थिती ठेवा असं शिवसेनेच्या (shivsena) वकिलाने का सांगितलं, हे काही कळलं नाही, असं सांगतानाच सगळा कानुनी लोच्या झाला आहे. देशाला मार्गदर्शक ठरेल असा निकाल कोर्टाला द्यावे लागेल, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

 

 

 

Published on: Jul 20, 2022 02:40 PM