छगन भुजबळांचं जागांसाठीचं बळ नेमकं कुणासाठी? लोकसभा निकालाआधीच विधानसभेच्या जागांचा वाद

छगन भुजबळांचं जागांसाठीचं बळ नेमकं कुणासाठी? लोकसभा निकालाआधीच विधानसभेच्या जागांचा वाद

| Updated on: May 28, 2024 | 11:39 AM

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विधानसभेच्या जागांबाबत दावा करून लोकसभेला जे घडलं त्यावर भुजबळांची नाराजी.... विधानसभेला आपण किती जागा लढवणार? याचा सोक्षमोक्ष करा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडू नये, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विधानसभेच्या जागांबाबत दावा करून लोकसभेला जे घडलं त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. सत्तेत सामील झाल्यानंतर आपण ९० विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, असं अजित पवार म्हणाले होते. पण आताच यावर चर्चा करून घ्या, असा नाराजी वजा सूर छगन भुजबळ यांचा पाहायला मिळाला. विधानसभेला आपण किती जागा लढवणार? याचा सोक्षमोक्ष करा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडू नये, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. आपली ताकद दाखवा त्याशिवाय जागा कशा मिळतील, असं वक्तव्य काही महिन्यांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं. हे वक्तव्य करणारे प्रफुल्ल पटेल आता छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर त्यांची समजूत काढताना दिसले. बघा नेमकं काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ?

Published on: May 28, 2024 11:39 AM