सर्व्हे काहीही असू देत, छत्रपती संभाजीनगरात चंद्रकांत खैरेंचा पराभवच, कुणी केला थेट दावा?

सर्व्हे काहीही असू देत, छत्रपती संभाजीनगरात चंद्रकांत खैरेंचा पराभवच, कुणी केला थेट दावा?

| Updated on: Jun 03, 2024 | 1:16 PM

'निकालाला काही तास बाकी आहे. छत्रपती संभाजीनगराचा जो निकाल लागेल तो महायुतीच्या बाजूने लागेल, सर्व्हे काहीही असू देत पण प्रत्यक्षात आम्ही मतदारसंघात फिरलो त्यात मतदारांनी दिलेल्या साथीवर एक ते दीड लाख मतांनी आपला विजय होईल', लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी कुणी व्यक्त केला विश्वास?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहे. असे असतानाही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार-पलटवार सुरू आहे. अशातच शिवसेनेचे नेते महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी मोठा दावा केला आहे. निकालाला काही तास बाकी आहे. छत्रपती संभाजीनगराचा जो निकाल लागेल तो महायुतीच्या बाजूने लागेल, असा विश्वसाही संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलवरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्व्हे काहीही असू देत पण प्रत्यक्षात आम्ही मतदारसंघात फिरलो त्यात मतदारांनी दिलेल्या साथीवर एक ते दीड लाख मतांनी आपला विजय होईल. सर्व्हे काहीही सांगू देत पण आम्हाला प्रत्यक्ष फिरल्यानंतर मतदान किती झालंय याचा अंदाज आलाय. तर ग्रामीण भागासह शहरात देखील मला लीड मिळेल अशी खात्री आहे. खैरे काही बोलतात, ते काही भविष्यकार नाहीत. उद्यापर्यंत निकाल त्यांच्या समोर येईल. सर्व्हे काहीही असू देत, छत्रपती संभाजीनगरात चंद्रकांत खैरेंचा पराभव होणारच असा विश्वास भुमरे यांनी व्यक्त केला.

Published on: Jun 03, 2024 01:15 PM