मुख्यमंत्री फडणवीस, धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका

मुख्यमंत्री फडणवीस, धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या ‘सरेंडर’वरून शंका

| Updated on: Jan 01, 2025 | 11:08 AM

वाल्मीक कराडने सरेंडर केलं मात्र त्यावरून छत्रपती संभाजीराजे आणि भास्कर जाधवांनी शंका उपस्थित केलेली आहे. काल मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडेंची चर्चा झाली आणि त्यानंतर वाल्मीक कराडने सरेंडर केलं. या भेटीत नेमकं काय ठरलं असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे.

वाल्मीक कराडने सरेंडर केलं आणि त्यावरून छत्रपती संभाजीराजे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी शंका उपस्थित केली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची चर्चा झाली आणि त्यानंतर वाल्मीक कराडने सरेंडर केलं. त्या चर्चेत काय दडलंय ते समोर यायला पाहिजे असं संभाजीराजे म्हणाले. वाल्मीक कराडच्या मागे सीआयडीची नऊ पथक होती पण वाल्मीक कराड सीआयडीच्या हाती लागला नाही. विशेष म्हणजे सीआयडी समोर सरेंडर होण्याआधी एक व्हिडिओही त्याने जारी केला. ज्यात राजकीय द्वेषातून आपल्यावर आरोप होत असल्याचं म्हटलेलं आहे. तोपर्यंत सीआयडीला वाल्मीकचा पत्ताही लागला नाही. ज्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मीक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात आला ती गाडी अनिता शिवलिंग मोराळे यांच्या नावावर आहे. हा शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे. त्याच्या फेसबुकच्या डीपीवरही शिवलिंग मोराळे आणि धनंजय मुंडेंचा फोटो आहे. म्हणजेच काय वाल्मीक कराडने वेळ, ठिकाण आणि गाडीही स्वतःच्याच मनाने निवडली. वाल्मीक कराड पुण्याच्या सीआयडीच्या कार्यालयात येईपर्यंत सीआयडीला कानोकांत खबर लागली नाही. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँडच आहे. मुंडेंचे जिल्ह्यातले कार्यक्रम आणि इतर कारभार वाल्मीक कराडच पाहत होता. त्यामुळेच वाल्मीक कराडला वाचवलं जातंय असा आरोप होतोय पण अखेर सरेंडर का होईना तो पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्येवरून सर्व काही समोर येईल अशी आशा आहे.

Published on: Jan 01, 2025 11:08 AM