कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे मुंबईच्या दिशेने रवाना

कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे मुंबईच्या दिशेने रवाना

| Updated on: May 24, 2022 | 4:15 PM

मातोश्रीवर शिवबंधन बांधण्यासाठीचं आमंत्रणही त्यांना देण्यात आलं. मात्र संभाजीराजेंनी हा प्रस्ताव फेटाळला. छत्रपती घराण्याचा सन्मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होईल, असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला.

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून (ShivSena) दोन उमेदवारांच्या नावची घोषणा आज संध्याकाळी होणं अपेक्षित आहे. संभाजीराजेंना आपला पाठिंबा असेल पण आधी त्यांना शिवसेनेत यावं लागेल, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. मातोश्रीवर शिवबंधन बांधण्यासाठीचं आमंत्रणही त्यांना देण्यात आलं. मात्र संभाजीराजेंनी हा प्रस्ताव फेटाळला. छत्रपती घराण्याचा सन्मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होईल, असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला. त्यानंतरही संभाजीराजे शिवसेनेत आले तरंच आम्ही पाठिंबा आणि उमेदवारी देऊ, अशी भूमिका संजय राऊत यांनी आज पुन्हा स्पष्ट केली. आता संध्याकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सर्व प्रश्नांना उत्तर देणार आहेत. त्यानंतरच छत्रपतींचा सन्मान की सच्च शिवसैनिक राज्यसभेवर उभा राहिल, हे स्पष्ट होईल. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून पुढील चित्र लवकरच दिसून येईल.