एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर…, ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
संदीपान भुमरे नाही तर इम्तियाज जलील हे माझे खरे प्रतिस्पर्धी आहे. तर इम्तियाज जलील हे गेल्या निवडणुकीत चुकून निवडून आलेत पण यावेळेला ते निवडून येणार नाहीत, असा दावा देखील चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. संदीपान भुमरे यांना काय दिला चंद्रकांत खैरे यांनी इशारा... बघा व्हिडीओ
एक-दोन दिवस थांबा संदीपान भुमरे यांच्यावर देखील बोलतो, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी इशारा दिला आहे. संदीपान भुमरे नाही तर इम्तियाज जलील हे माझे खरे प्रतिस्पर्धी आहे. तर इम्तियाज जलील हे गेल्या निवडणुकीत चुकून निवडून आलेत पण यावेळेला ते निवडून येणार नाहीत, असा दावा देखील चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. संदीपान भुमरे हे बाहेरचे आहेत, असा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले मी बाहेरचा म्हणजे पाकिस्तानातून आलोय का? मी संभाजीनगरचा भूमिपूत्र आहे असा थेट प्रत्युत्तर त्यांनी दिलं होतं. यावर चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘लोक मला सांगतात की, संदीपान भुमरे हे बाहेरचे उमेदवार आहेत, पण कोणीही कुठेही उभे राहू शकतं, हे मी लोकांना सांगत असतो. तर मला एक दोन दिवस द्या मग बोलतो त्यांच्याबद्दल…’, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे.