तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या सभेला परवानगी नाकारली; काय आहे कारण? पाहा…

| Updated on: Apr 19, 2023 | 9:57 AM

Telangana Chief Minister KC Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या सभेला परवानगी नाही; आता पुढचं पाऊल काय?

छत्रपती संभाजीनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे. पण के सी राव यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. शहरातील आमखास मैदानावर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सभेसाठी दुसरे मैदान शोधनाच्या पोलिसांच्या आयोजकांना सूचना दिल्या आहेत. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरही सभेसाठी पोलिसांची नकार आहे. तर मिलिंद कॉलेजचे स्टेडियम मैदान के सी राव यांनी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. के सी राव यांच्या सभेसाठी अजूनही मैदान मिळाले नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री के सी राव यांच्या सभेसाठी अजूनही मैदानाची शोधाशोध सुरूच आहे.

Published on: Apr 19, 2023 09:41 AM
चौकशीचा फेरा वाढला; काल आठ तास, आजही होणार ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची चौकशी
पुण्यात बॅनरबाजी, पोटनिवडणुकीआधीच प्रशांत जगताप भावी खासदार? बॅनरवर नक्की लिहिलंय तरी काय?