नारायण राणेंची ठाकरे समर्थकांना थेट मारून टाकण्याची धमकी, राजकोट किल्ल्यावरील राड्यात नेमकं काय घडलं?
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे हे एकाच वेळी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर दाखल झालेत. दोघांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी आणि नंतर दोघांत मोठा राडा झाला. यानंतर राणेंनी घरात खेचून एकेकाला मारून टाकेन अशी धमकीच दिली.
मालवणमध्ये जो राडा झाला त्यादरम्यान, नारायण राणेंचा संताप पोलिसांवर उमटला. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना अंगावर येऊ द्या, एकेकाला मारून टाकतो अशी धमकीच नारायण राणे यांनी पोलिसांसमोर दिली. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे पिता-पुत्र आणि आदित्य ठाकरेंसह मविआचे नेते राजकोट किल्ल्यावर आमने-सामने आलेत. त्यानंतर राड्याला सुरूवात झाली. पोलिसांनी राणे समर्थकांना रोखून आदित्य ठाकरे आणि मविआचे नेते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी वाट मोकळी करून दिली. पाहणी झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी किल्ल्याच्या मागच्या बाजूला बाहेर काढा, किल्ल्याच्या मुख्यप्रवेशद्वारातून बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका निलेश राणे यांनी घेतली आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकारामुळे आदित्य ठाकरेंनी किल्ल्यावरच दोन तास ठिय्या मांडला. बघा नंतर नेमकं काय घडलं?