स्पर्धेची मानाची 35 लाखांची गदा महेंद्र गायकवाडच्या हातात

| Updated on: Apr 24, 2023 | 8:57 AM

महेंद्र गायकवाडने एकचाकी मारून शिवराजला खाली टाकले. त्यामुळे शिवराज जखमी झाला. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याच्या पायाचे स्नायू तुटल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आणि महेंद्र गायकवाड याला विजेता घोषित करण्यात आले

अहमदनगर : छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेला महेंद्र गायकवाड आणि उपमहाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या नावामुळे एकच रंगत आली होती. याच्याआधी पुणे येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हे दोघे आमने सामने आले होते. तेंव्हा पक्षपातीपणा झाल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे या लढतीकडे तमाम कुस्ती शौकिनांचे डोळे आजच्या लढतीकडे लागले होते. या लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयाची माती सोलापूरच्या महेंद्र गायकवाडच्या अंगावर पडली आणि एकच जल्लोष पहायला मिळाला. महेंद्र गायकवाडने एकचाकी मारून शिवराजला खाली टाकले. त्यामुळे शिवराज जखमी झाला. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याच्या पायाचे स्नायू तुटल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आणि महेंद्र गायकवाड याला विजेता घोषित करण्यात आले. तर बाहुबली ठरलेल्या महेंद्र गायकवाडला मानाची 35 लाख रुपये किमतीची अर्धा किलो वजनाची गदा देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यास सोन्याची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आमदार राम शिंदे हे उपस्थित होते.

Published on: Apr 24, 2023 08:57 AM