उदयनराजे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? काय व्यक्त केली इच्छा?

उदयनराजे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? काय व्यक्त केली इच्छा?

| Updated on: Feb 19, 2024 | 4:39 PM

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुढे ते असेही म्हणालेकी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने विकास केला, त्यामुळे लोकसभा लढताना वेगळा विचार करणार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

नागपूर, १९ फेब्रुवारी, २०२४ : लोकसभा लढण्याची सर्वांचीच इच्छा असते, मी अपवाद नाही, असे वक्तव्य करत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहे. म्हणजेच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुढे ते असेही म्हणालेकी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने विकास केला, त्यामुळे लोकसभा लढताना वेगळा विचार करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना म्हटले की, अजून लोकसभेचं कोणतंही जागा वाटप झालं नाही. कोणाला कोणती जागा दिली जाईल हेच ठरलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराची चर्चाच नाहीये. त्यामुळे केवळ राजकीय वर्तुळात अफवा पसरवण्याची कामं सुरू आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

Published on: Feb 19, 2024 04:39 PM