Devendra Fadnavis : 'श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत...', मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता विरोधकांना टोला

Devendra Fadnavis : ‘श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत…’, मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता विरोधकांना टोला

| Updated on: Jan 12, 2025 | 5:50 PM

आज शिर्डीत भाजपाचं प्रदेश महाविजय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील भाजपाचे सर्व नेते दिग्गज तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह हे देखील हजर झाल्याचे पाहायला मिळाले.

विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळालं या विजयानंतर आज शिर्डीत भाजपाचं प्रदेश महाविजय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील भाजपाचे सर्व नेते दिग्गज तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह हे देखील हजर झाल्याचे पाहायला मिळाले. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं. “भाजपात श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले, ज्यांना नाही समजलं त्यांची निवडणुकीत हालत बुरी झाली.”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला. पुढे ते असेही म्हणाले, मकरसंक्रमण संपून महाकुंभाचे अमृत घेण्यासाठी हजारो लोक एकत्र येत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला शंभरहून अधिक जागा दिल्या. गेल्या 30 वर्षात ही कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. लोकसभेत आपल्या 17 जागा निवडून आल्या. पण त्यानंतर आपण प्रयत्न केले. 288 पैकी 237 जागा जिंकून आपण इतिहास निर्माण केला आणि मेरिटमध्ये पास झालो. भाजपने आजवरच्या सत्ताधारी पक्षाच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Published on: Jan 12, 2025 05:50 PM