आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी होती. कार्यकर्ते, नेते आणि आमदारांशी उद्धव ठाकरे यांचा संपर्क नव्हता, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर एका वृत्तपत्राला मुलाखत देताना एकनाथ शिंदे असेही म्हणाले, शिवसेना आमच्याकडे आहे आणि शिव्यासेना ठाकरे गटाकडे आहे.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी हे विधान केलं आहे. महायुतीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री कसे चालतात? असा सवाल एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला असता त्यांनी आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात असल्याचे म्हणत उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी होती. कार्यकर्ते, नेते आणि आमदारांशी उद्धव ठाकरे यांचा संपर्क नव्हता, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर एका वृत्तपत्राला मुलाखत देताना एकनाथ शिंदे असेही म्हणाले, शिवसेना आमच्याकडे आहे आणि शिव्यासेना ठाकरे गटाकडे आहे. तीन पक्षांचे सरकार असलं की समन्वय हवा पण महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती वेगळी होती. मविआ सरकारमध्ये मी मुख्यमंत्री नव्हतो, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.