'३ जिल्ह्यातंही कुणी ओळखत नव्हतं, ३३ देशांत गद्दार म्हणून ओळख', उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

‘३ जिल्ह्यातंही कुणी ओळखत नव्हतं, ३३ देशांत गद्दार म्हणून ओळख’, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

| Updated on: May 06, 2023 | 1:54 PM

VIDEO | रत्नागिरीतील बारसू येथे उद्धव ठाकरे बरसले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नेमकी काय केली सडकून टीका, बघा व्हिडीओ

रत्नागिरी : बारसू येथील रिफायनरीला विरोध दर्शविण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वतः आज बारसू दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली आणि आपण या प्रकरणात त्यांच्या पाठिशी असल्याचा शब्द दिला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सध्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांची ३३ देशांमध्ये गद्दार अशी ओळख आहे. याआधी त्यांना मंत्री म्हणून ३ जिल्ह्यांमध्येही कुणी ओळखत नव्हतं असे म्हणत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर बरसले. ते म्हणाले, मला तर असं सांगायचं आहे की, आता जे बसलेत गद्दार आपले मुख्यमंत्री त्यांची ३३ देशात गद्दार म्हणून ओळख झाली आहे. पण मार्ग कसा काढायचा असतो हे सांगण्यासाठी मी त्यांचा उल्लेख केला आहे. नाहीतर त्यांचा उल्लेखाची गरज नाही. आज या गद्दारांना गद्दार म्हणून ३३ देशात ओळख झालीये. त्यावेळी ३३ सोडा ३ जिल्हेही त्यांना मंत्री म्हणून ओळखत नव्हतं कोणी, असे म्हणत जोरदार टीका केली.

Published on: May 06, 2023 01:54 PM