डी. लिटवरून राऊतांचा शिंदेंना टोला; म्हणाले, आम्हाला मुका मार देता येतो
ऑपरेशनचं आम्हाला सांगू नका. आम्हाला मुका मार देता येतो. तुम्ही ऑपरेशन करत राहा. डॉक्टर महाराष्ट्रात पायलीला 50 मिळतात, असंही राऊत म्हणाले
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी. लिट पदवीने सन्मानित करण्यात आलं आहे. त्या समारंभात शिंदेंनी राजकीय टोलेबाजी केली होती. तसेच यापूर्वीच मी डॉक्टर झालोय. छोटीमोठी ऑपरेशन करत असतो असं म्हटलं होतं. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदेवर प्रखर टीका करताना आम्हाला आम्हाला मुका मार देता येतो असा टोला लगावला आहे.
राऊत यांनी यावेळी, डॉक्टरांना विचारा की, सावरकर कोणत्या बोटीतून उडी मारून कोणत्या बंदरावर गेले”, हे विचारा. ऑपरेशनचं आम्हाला सांगू नका. आम्हाला मुका मार देता येतो. तुम्ही ऑपरेशन करत राहा. डॉक्टर महाराष्ट्रात पायलीला 50 मिळतात, असंही राऊत म्हणाले. तर प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळत असते हा अनुभव आहे. डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी व्हायला पाहिजे. भ्रष्टाचाराचे आरोप होणाऱ्यांना डॉक्टरेट कशी देता? एकनाथ शिंदे डॉक्टर झाले असतील तर आनंदच आहे. पण त्यांनी स्वत:वरच शस्त्रक्रिया करायला हवी, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे