शिवसेना नेत्याचा संजय राऊत यांच्यावर निशाणा; म्हणाले, जनतेनंचं डिलिट केलं
पावसकर यांनी संजय राऊत हे स्वतःला नेते आणि महाविकास आघाडीचे प्रवक्ते समजतात. मात्र एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांना जनतेनंचं डिलिट केलं आहे, असा टोला त्यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटाला लगावला आहे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल डी. वाय. पाटील विद्यापीठाने डी. लिट पदवीने सन्मानित केलं. त्यानंतर शिंदे यांनी आपण अशा छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करत असतो, अशे म्हटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी कधी शस्त्रक्रिया केली होती असा खोचक सवाल सवाल केला होता. त्यानंतर यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
पावसकर यांनी संजय राऊत हे स्वतःला नेते आणि महाविकास आघाडीचे प्रवक्ते समजतात. मात्र एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांना जनतेनंचं डिलिट केलं आहे, असा टोला त्यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटाला लगावला आहे. शिंदे यांच्याकडून महाविकास आघाडीवर राजकीय अस्त्रक्रिया झाल्याचे पावसकर म्हणाले. त्यामुळे शिंदे यांच्यावर ज्यांनी ज्यांनी टीका केली, त्यांना मतदारांनीच डिलिट करून टाकले आहे असा टोलाही त्यांनी राऊत यांना लगावला आहे.