‘एका विजयाने हुरळून जाऊ नये’, पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं
VIDEO | कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले बघा
मुंबई : कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मतदारांनी जो निर्णय दिला आहे, तो आम्हाला मान्य आहे. या निवडणुकीबद्दल पिंपरी-चिंचवड मतदार संघातील मतदारांचे आभारही मुख्यमंत्र्यांनी मानले. या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना मतदारांनी विजयी केल्याबद्दल त्यांचे त्यांनी अभिनंदनही केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अश्विनी जगताप यांचा या पोटनिवडणुकीतील विजय हीच खरी लक्ष्मण जगताप यांनी श्रद्धांजली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळाला नसला तरी यापुढच्या काळात कसब्यातील मतदारांची मनं ही जास्तीची कामं करून मिळवू असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिली. या एका विजयाने विरोधकांनी हुरळून जाता कामा नये, असा खोचक टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
Published on: Mar 02, 2023 11:30 PM
Latest Videos