महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच हे सरकार…
लाखो अनुयायी आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादार येथील चैत्यभूमीवर दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज दादरच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि राज्यपाल रमेश बैस यांनीदेखील बाबासाहेबांना अभिवादन केले
मुंबई, ६ डिसेंबर २०२३ : देशाच्या काना-कोपऱ्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादार येथील चैत्यभूमीवर दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज दादरच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि राज्यपाल रमेश बैस यांनीदेखील बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला जयभीम म्हणत भाषण केलं. मुख्यमंत्री म्हणाले, चैत्यभूमीवर येऊन माथा टेकणं म्हणजे बाबासाहेब यांना अभिप्रेत असणाऱ्या जीवन मुल्यांचं जागर करणं, बाबासाहेब यांनी दिलेल्या सशक्त आणि सक्षम भारतीय संविधानाच्या आधारावर आपल्या देशाच्या लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. मानवतेच्या विचारांच्या साथीनं विविध क्षेत्रातील धोरणांची आखणी त्यांनी केली. त्यामुळे देशात एकता बंधुता, एकता आणि ऐकात्मता तत्वांना बळ मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.