मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर, यासह जाणून घ्या मोठ्या घडामोडी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर, विविध बैठका आणि कार्यक्रमांना लावणार हजेरी तर पोटनिवडणुकीचा आढावा घेण्याचीही शक्यता...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असून विविध बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत तर पोटनिवडणुकीचा आढावा घेण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी या दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा तर वंदे भारत एक्सप्रेस देशाचा विकासाचे प्रतिक असल्याचेही मोदी यांनी लोकार्पणानंतर म्हटले आहे. डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तर रेल्वे आणि मेट्रोचा विस्तार झाल्याचे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुकही त्यांनी केलं. तर सरकार डबल इंजिनच असो किंवा चार इंजिनचं कितीही इंजिन लावा मुंबईत भगवाच फडकणार, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह मोदींना टोला लगावला आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीत आज दिग्गज नेते मंडळींकडून प्रचार करण्यात येणार आहे. आज भाजप नेते नारायण राणे हेमंत रासने यांच्यासाठी कसब्यातून तर काँग्रेस नेते धंगेकरांसाठी प्रचार करणार आहेत.