सगेसोयऱ्यांबाबत मनोज जरांगेंचा सरकारला सवाल; मराठा आरक्षणाबाबत पुन्हा दिला मोठा इशारा
'ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नसतील त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार असल्याची घोषणा सरकारने केली. ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना स्वतंत्र SEBC प्रमाणे आरक्षण मिळणार आहेत. तर ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे.', मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे आला असून मराठ्यांना स्वतंत्र कायदा मिळणार आहे. मात्र सगेसोयऱ्यांचा कायदा हवा नाहीतर पुन्हा आंदोलन करू मागे नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. दरम्यान, टीव्ही ९ मराठीच्या बातमीवर सरकारने शिक्कामोर्तब केला आहे आणि ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नसतील त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार असल्याची घोषणा सरकारने केली. ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना स्वतंत्र SEBC प्रमाणे आरक्षण मिळणार आहेत. तर ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडताय त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही. तर यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं होतं. तर सुप्रीम कोर्टानं ते आरक्षण रद्द केलं होतं. बघा यासंदर्भात स्पेशल रिपोर्ट