Maratha protest mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेंचं उपोषण सोडवणार

| Updated on: Jan 27, 2024 | 9:53 AM

मराठा आंदोलनाला यश, वाशीमध्ये मराठा बांधवांचा मोठा जल्लोष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी वाशीमध्ये दाखल

Maratha protest mumbai: मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश, लढा यशस्वी झाल्याने मराठा बांधवाचा वाशीमधील शिवाजी चौकात मोठा जल्लोष. सध्या नवीन मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांची विजयी रॅली सुरु आहे. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव देखील सहभागी झाले आहेत.

जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य

ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला लागू केल्या जाणार तसेच 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र मिळणार. मराठवाड्यात नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ दिली जाणार. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार. अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार. आगामी अधिवेशनात कायदा पारित केला जाणार.

Published on: Jan 27, 2024 09:52 AM
Maratha protest mumbai: मनोज जरांगेंचा लढा यशस्वी, मराठा बांधवांचा आनंदोत्सव
मराठा आरक्षणावर छगन भुजबळ यांची कडक प्रतिक्रिया; म्हणाले, …तर कोर्टात जाऊ