ठाणे-नाशिक महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू, मुख्यमंत्री शिंदे यांनी काय दिले आदेश?

ठाणे-नाशिक महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू, मुख्यमंत्री शिंदे यांनी काय दिले आदेश?

| Updated on: Apr 23, 2023 | 1:48 PM

VIDEO | मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव पुलाचे काम सुरू, साकेत मार्गाने वळवली वाहतूक; मुख्यमंत्र्यांनी कोणते दिले आदेश?

ठाणे : ठाणे ते नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून हे काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिलेले आहेत. तर याच कामासाठी ठाण्यातील वाहतूक काही प्रमाणात वळवण्यात आलेले आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव पुलाचे काम करण्यासाठी साकेत मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली असून यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीला प्रवशांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यापूर्वी या महामार्गावर सर्विस रोडचे काम पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे येणारा काळात ठाणे नाशिक महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन ठाणेकर आणि नाशिककरांचा प्रवास आणखी जलद होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

Published on: Apr 23, 2023 01:48 PM